सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा हे अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा हे अभियान राज्य भर राबविण्यात आले. या अभियानाचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. या मधून बारामती तालुक्यातून प्राथमिक/सरकारी शाळातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळशी (वाणेवाडी) या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तालुकास्तरावरील पाहिले ३ लाखांचे पारितोषिक मिळवले आहे तर सांगवीच्या शाळेने २ लाख रुपयांचे तर लिमटेक शाळेने १ लाखांचे तिसरे बक्षिस मिळवले.
या अभियांनामध्ये शाळेने प्रधानमंत्री पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ठ अशा पारस बागेची निर्मिती केली आहे. यामधे पालेभाज्या, फळभाज्या औषधी वनस्पती यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता रुजवण्या साठी डिजीटल/तंद्रज्ञानाचा वापर, लोकशाही संसदीय मुल्याच वापर , गांडूळ खत प्रकल्प , घन कचरा व्यवस्थापन , व्रुक्ष रोपण अध्ययन अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव, व्यावसाय, शिक्षणाची तोंड ओळख, बचत बँक उपक्रम, अंगभुत कला - क्रीडा गुणांचा विकास, वर्ग सजावट , शालेय परिसर स्वच्छ व सुंदर आकर्षक इमारत रंगरंगोटी. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत नेमून त्यांनी समाजात जागृती/प्रबोधने करणे यासारखे उपक्रम प्रभावी पणे राबविले.
लोकसहभागातून विविध उपक्रम व विविध कामे केली आहेत.
विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत वाणेवाडी या सर्वांच्या सहकार्यामुळे शाळेस यश मिळाले. मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे व शिक्षक संतोष निकाळजे यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS