सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मागील चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले होते.
यामध्ये आमदार संग्राम थोपटे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे भोर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांचा झालेल्या माळेगाव ता.भोर येथील येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार थोपटेंनी महाविकास आघाडी बरोबरच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय उधानाला पूर्णविराम मिळाला.
शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट का शरदचंद्र पवार गटाला साथ देणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते.मात्र आमदार थोपटे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत महाविकास आघाडीच्या शनिवार दि.२ झालेल्या मेळाव्याला उपस्थित राहून महाविकास आघाडीबरोबरच असून कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले कार्यकर्त्यांमधील राजकीय संभ्रमावस्था दूर झाली आहे.
COMMENTS