खंडाळा l 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या बातमीची दखल ! मरीआईचीवाडी ते पिंपरे या रस्त्याचे काम होणार सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
मरीआईची वाडी ते पिंपरे या रस्त्याचे निधी मंजूर असून सुद्धा काम चालू का होत नाही ते लवकरात लवकर चालू व्हावे याकरिता लोणंद शिरवळ हा रोड मरीआईची वाडी फाटा येथे रस्ता रोको करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना रस्ता रोको चालू होण्याअगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री काटकर तसेच शाखा अभियंता श्री मत्सूद हे संबंधित रास्ता रोको या ठिकाणी येऊन सदर रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कार्यारंभ आदेश आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्राप्त होईल. याबाबत चार दिवसांपूर्वी याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. 
               तसेच आचारसंहिता लागण्याअगोदर कामाला सुरुवात करू असं आश्वासन देऊन आपण रास्ता रोको आंदोलन करू नये यासाठी विनंती केली. यावेळी लोणंद पोलीस खात्याचे पोलीस तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक ही तिथं मोठ्या संख्येने हजर होते. आचारसंहिता लागण्या अगोदरच आम्ही कामाला सुरुवात करू याच पत्रही उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खंडाळा यांच्यामार्फत आंदोलकांना देण्यात आले हे पत्र स्वीकारताना विलास देडे कुंडलिक देडे मयूर पाडसे अक्षय केसकर विकास धायगुडे अतुल बिचुकले योगेश शेंडगे लखन बिचुकले निखिल धायगुडे आदी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. तसेच लोणंद पोलीस स्टेशनचे श्री. दडस श्री घनवट श्री नलवडे आधी पोलीस प्रशासन किती ते उपस्थित होते. 
या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि रस्त्याचे काम आचारसंहिता लागण्यापूर्वी चालू करण्याच्या आश्वासनावर हातचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. व आचारसंहिता लागण्या अगोदर जर कामाला सुरुवात झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू व मतदानावर बहिष्कार टाकू असंही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी सांगितले. 
To Top