सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
नीरा येथील युवा साहित्यिक सुनील पांडे यांनी लिहिलेले नर्मदाकाठची माणसे या पुस्तकाचे प्रकाशन १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नर्मदा जयंती या दिवशी ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रकाशन झाले.
ओंकारेश्वर येथील संत गजानन महाराज मठ याठिकाणी उपस्थित नर्मदा परिक्रमावासी यांच्या शुभहस्ते नर्मदाकाठची माणसे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नर्मदा जयंतीच्या दिवशी नीराकाठी राहणा-या लेखक सुनील पांडे यांच्या नर्मदाकाठी ओंकारेश्वर याठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने लेखक सुनील पांडे यांचे विशेष कौतुक होत आहे.
नर्मदाकाठची माणसे या पुस्तकाबद्दल बोलताना स्नेहवर्धन प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ स्नेहल तावरे मॅडम म्हणाल्या, " नर्मदा विद्यापीठ ख-या अर्थाने ज्ञानदान करत आहे. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा धडा नर्मदा मैय्या आपल्या नर्मदा पुत्रांना देते. नर्मदेच्या या मातृप्रेमाच्या धबधब्यात आपण चिंब भिजून जातो आणि आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी असा विचार पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनात येतो. नदीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे लेखक सुनील पांडे यांचे नर्मदाकाठची माणसे या पुस्तकाचे वाचक नक्कीच स्वागत करतील.