सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती प्रतिनिधी आज दिनांक 3 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मधे विविध प्रकारचे खटले तड जोडीसाठी ठेवण्यात आले होते ..त्यापैकी 6161 खटल्यात तडजोड होवून 8 कोटी 45 लाख 96 हजार 392 रुपयांची वसुली झाली .
मुख्य जिल्हा न्यायाधीश जे पी दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा समिती व वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अनेक खटले तडजोडीत निघाले . दर वेळच्या प्रथेप्रमाणे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वेळ न घालवता सकाळपासूनच खटल्यांच्या तडजोडीला सुरुवात झाली.यामधे बँक वसुली, महसुली खटले कौटुंबिक खटले .
अपघात नुकसान भरपाई खटले, विज बिल थकबाकी पाणी बील थक बाकी तसेच 138 चेक वसुलीचे खटले तडजोडी साठी ठेवण्यात आले होते त्यापैकी 6161 खटले मध्ये तडजोड होऊन सुमारे साडेआठ कोटी रुपये वसूल झाले. यामध्ये सर्वात जास्त बँक बँक वसुली चे कलम 131 खटले मध्ये पाच कोटी 85 लाख 82 हजार 807 एवढी विक्रमी रक्कम वसुली झाली. मोटर अपघाताच्या 17 खटल्यात तडजोड होऊन एक कोटी 41 लाख रुपये पक्षकारांना द्वारे मंजूर झाले. त्यामध्ये प्रामुख्याने.एकूण 9 खटले ऍड विशाल बर्गे यांनी दाखल केलेले होते . विमा कंपनी द्वारे त्यांनी 79 लाख रुपये तड जोडीद्वारे पक्षकारांना मिळवून दिले ..अपघातात जखमी पक्षाकाराला 12 लाख रुपये उचांकी मदत मिळवून दिली. तसेच नितीन खूपसे यानी केलेल्या तडजोडीत मयताच्या वारसाला 67 लाख रुपये इतकी भरपाई मिळवून दिली .
दिवाणी खटल्यामध्ये सहा कोटी 88 लाख 2 हजार रू वसूल झाले.मुख्य जिल्हा न्यायाधीश जे पी दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोक दालतील सात पॅनल ची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हा न्यायाधीश आर के देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस एस सस्ते , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए आर मरछीया कोर्ट , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस टी चिकणे, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्टार एन आर वानखेडे, प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी श्रीमती एन वी रणवीर, प्रथम वर्ग न्यायंदांडाधिकारी ए जे गिरे कोर्टाने पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले . बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट उमेश काळे यांचे सह विधी सेवा समितीचे सदस्य एडवोकेट मीनल भंडारे, एडवोकेट सचिन ननवरे एडवोकेट शिवाजी, ए जगर एडवोकेट मानसी जवजाल, एडवोकेट डीडी रुपनवर, एडवोकेट स्नेहल काळे इत्यादींनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.