सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर असताना शुक्रवार दि.१ माळवाडी ता.भोर येथील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निवासस्थानी जाऊन थोपटे यांची भेट घेतली.यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपात थोपटे, चिरंजीव पृथ्वीराज थोपटे यांचीही भेट घेतली.आमदार थोपटे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकार मध्ये सहभाग घेतला.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असतल्याने मागील काही महिन्यापूर्वी खासदार सुळे यांनीही माजी मंत्री घेतली होती.
COMMENTS