सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वरवडी-पालेच्या पालसिद्धेश्वर देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या मल्लांनी चित्रपट कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. तर शेवटची मानाची ७५ हजार रुपये व गदेची वरील कुस्ती समीर शेख यांने जिंकली.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या पालसिद्धेश्वराच्या समोरील कुस्त्यांच्या आयोजित आखाड्यात पुणे,सातारा जिल्ह्यातून नामवंत २०० हून अधिक मल्लांनी उपस्थिती दाखवून चमकदार खेळी करून चित्रपट कुस्त्या केल्या.आखाड्यात १०१ रुपयांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात आले. मल्लांनी नेत्र दीपक कुस्त्या केल्याने कुस्ती शोकिनांच्या डोळ्याची पारणे फेडले.यावेळी पंच म्हणून खरेदी विक्री संघ संचालक दिलीप वरे,पै.अंतोबा वरे ,माउली वरे,सदाशिव वरे,माजी सरपंच राजेंद्र वरे, धर्मु वरे,अरुण वरे,संदेश वरे,नाथा वरे,बापू वरे,बाळू वरे यांनी काम पाहिले.आखाड्यादरम्यान वरवडी खुर्द, डायमुख,बुद्रुक तसेच पाले गावातील यंदाच्या वर्षी शासकीय कामात रुजू झालेल्या तरुण-तरुणींचा तर नवीनच कुस्ती कोच म्हणून निवड झालेल्या पै.स्वप्निल वरे याचा विशेष सत्कार करण्यात आला.
COMMENTS