सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागा अंतर्गत आणि विद्यार्थी विकास मंडळ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्याशाळा " जीवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास " या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनाकरिता आयोजित करण्यात आली. त्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गिरीश कुकरेजा, उपस्थित होते.
प्रा. कुकरेजा यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये , भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये, योग्य कृती, सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. या मिळालेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. कार्यशाळेच्या उ्घाटन कार्यक्रमा साठी श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे , संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. गिरीश कुकरेजा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. बनसोडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. जी. पिंगळे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. भांडवलकर यांनी केले. कार्यशाळेचे समनव्यक आणि आभार प्रदर्शन प्रा. जे. एम. भोसले यांनी काम पाहिले.
COMMENTS