वाई : प्रतिनिधी
सातारा जिल्हयामध्ये वाई पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख अक्षय गोरख माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, वसंत ताराचंद घाडगे सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, ता. वाई, जि. सातारा यांचेवर गर्दीमारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी चोरी करणे, शिवीगाळ दमदाटी करणेबाबतचे दखलपात्र, तसेच अदखलपात्र गंभीर गुन्हे दाखल असल्याने वाई पोलीस ठाणेचे
प्रभारी अधिकारी बी. आर. भरणे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी बी. वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचे दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते वाई परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेचर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे वाई तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. वरील टोळीस समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होचुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २२ उपद्रवी टोळयांमधील ७१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे १७ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ९० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली
असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ.केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, वाई पोलीस ठाणेचे पो.कॉ. नितीन कदम, पो. कॉ. हेमंत शिंदे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.