सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
उञौली ता.भोर येथील गावात लोकसभा निवडणुक चिन्ह आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडण्यात आला. यामुळे राजकीय वातावरण ढवळले असुन फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला आहे.
भोर तालुक्याचे वीसगाव खोऱ्यातील उत्रौली ता.भोर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचा व तुतारी चिन्हासह सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्सवर ब्लेड मारून फाडण्यात आला.महत्त्वाचे म्हणजे जिथे आज सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम आहे त्याच ठिकाणचा फ्लेक्स फाडला गेला आहे.उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्याचा भागावर फुली मारून फ्लेक्स फडण्यात आला.सदरची घटना कळताच तात्काळ फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला आहे.बारामती लोकसमा मतदार संघात सद्या खासदार सुप्रिया सुळे विरुध्द सुनेञा पवार नणंद भावजय अशी लढत होईल असे चिन्ह आहे.यामुळे सध्या तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असुन उञौली गावात खासदार सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लावलेला फ्लेक्स ब्लेडचा वापर करुन फाडला.यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.निवडणुक आचारसंहिता जाहिर होण्याआगोदरच राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे,भविष्यात अजुन वाद वाढण्याची शक्यता आहे.