Baramati Breaking l मोरगाव येथे महावितरण महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला : भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने केला हल्ल्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
मोरगाव ता बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयात नुकतीच काही वेळापूर्वी घडलेली ही गंभीर घटना समोर आलीय. एका अज्ञात दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने येथील उपस्थित महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. यातील जखमी महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. 
        मोरगाव - जेजुरी या जिल्हा मार्गालगत शासकीय विश्रामगृह शेजारी महावितरण विभागाचे हे कार्यालय आहे. काही वेळापूर्वी या कार्यालयात कामकाज करत असलेल्या महिला वायरमन रिंकू बनसोडे यांच्यावर या ठिकाणी आलेल्या अज्ञात दुचाकी स्वार याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले. या कार्यालयाला लागूनच असलेल्या सबस्टेशन ठिकाणी कामकाज करणारे तंत्रज्ञ कर्मचारी मीटरचे रीडिंग घेण्यासाठी सब स्टेशनच्या आवारात काम करत होते यावेळी यांना या कार्यालयातून ओरडल्याचा आवाज आल्याने त्यांनी या कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी या महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या जखमी झाल्याचे निदर्शनास आले.
        अभिजीत पोटे ( रा. मोरगाव ) असे कोयत्याने वार केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी यास त्वरीत ताब्यात घेवुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मागिल आठ दिवसापुर्वी पोटे याने वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांच्या घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरीत तपासण्यात यावा याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी ( दि. २४ ) सकाळी ११ च्या दरम्यान जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत. 
      .......................................
     
To Top