Bhor News l भोरच्या अंबाबाई देवस्थानचा उत्सव उत्साहात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरचे शक्तिपीठ श्री अंबाबाई देवस्थानचा उत्सव चैत्र पौर्णिमेनिमित्त मंगळवार दि.२३ देवीच्या काठी पालखीची शहरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढून उत्साहात पार पडला.
     देवीचा अभिषेक,भोरेश्वर मंदिर काठीपूजन व प्रस्थान मंदिरापर्यंत, परडी भरणे कार्यक्रम, देवीची सुवासिन जेवण, देवीचा छबिना तसेच काठी पालखीचे प्रस्थान तर बुधवार दि.२४ होमहवन,देवीचा गोंधळ व महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव पार पडला.यावेळी भाविक -भक्त तसेच श्री अंबाबाई देवस्थान ट्रस्ट वेताळ पेठ (भोर) येथील लहान थोरांसह ग्रामस्थ ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


To Top