Baramati News l मनोहर तावरे l मोरगाव येथील प्राणघात खाल्ल्यात अखेर त्या महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : मनोहर तावरे
अत्यंत मन हे लावून टाकणारी ही घटना म्हणावी लागेल. महावितरण विभागातील हा काळा दिवस ठरला आहे.  कार्यालयात कामकाज करत असताना तंत्रज्ञान कर्मचारी रिंकू बनसोडे यांच्यावर अचानक  प्राण घातक हल्ला झाला.
बारामतीच्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'मोरगाव' या ठिकाणी या महिला कर्मचाऱ्यावर काळाने घाला घातला. गावातील विज ग्राहक तरुणांने केलेल्या कोयतेच्या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमावा लागला आहे.
--------------
 तरुणाईला आवरणे पोलिसांना मोठे आवाहन....
गेली चार दिवसापूर्वी सुपा  पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच एका घटनेत शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यातील आरोपी तसेच आज घडलेल्या घटनेतील आरोपी यांच्या वयात साम्य आहे.
सध्या वाढते गुन्हेगाराचे प्रमाण यातील तरुण गुन्हेगारांची वाढती संख्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. अनेक व्यसनाच्या निमित्ताने या भागातील तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होऊ लागले आहेत. यांना सावरणे आता पालकांनी हात टेकले आहेत. मोरगाव येथील या घटनेबाबत वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या पुढील काळात अशा घटना घडून येण्यासाठी तरुणांना मार्गदर्शक दिशा देणे आणि कायद्याचा वचक राखणे हि काळाची गरज ठरणार आहे
To Top