शिरोळ l चंद्रकांत भाट l जुलमी राजवट राबवणारे केंद्र सरकारला जनताच हद्दपार करेल : सत्यजित पाटील सरूडकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : चंद्रकांत भाट 
शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती महागाई बेरोजगारी स्त्रियांचे संरक्षण याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले केंद्र सरकार देशाची राजघटना बदलण्याचा प्रयत्न ईडीची भीती दाखवून सत्ता काबीज करत जुलमी राजवट राबवून जनतेची पिळवणूक करीत आहे हे सरकार जनतेच्या पसंतीस उरले नाही त्यामुळे देशात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीला मोठे पाठबळ मिळत आहे या सरकारला हद्दपार करण्याचा विडा मतदारांनी उचलला आहे यामुळे शिरोळ तालुक्यात मला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत माझा विजय पक्का आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी व्यक्त केला
येथील आझाद मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर यांनी स्वागत केले
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर प्रचार सभेत बोलताना पुढे म्हणाले की उमेदवारी मिळाल्यानंतर तालुक्याचा संपर्क दौरा सुरू केला यावेळी माझ्या लक्षात आले की येथील जनता संधी देणारी व प्रेम करणारी तसेच काम करून घेणारी आहे पण ज्यांना मनापासून मतदान केलं त्यांनीआपल्या पदरात काय पडलं याचा विचार येथील जनता करीत आहे त्याचमुळे दौऱ्यात आबा तुम्ही परत येणार का नाहीतर मागच्या सारखेच होणार असा प्रश्न विचारत आहेत पण मला जनसेवेचा वारसा असल्यामुळे मी नेहमीच जनतेच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे संधी दिला तर जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला हमीभाव मिळावा पिकविमा हे प्रश्न केंद्र शासनाकडे आहेत ते सोडवणे आवश्यक आहे यासाठी केंद्रातील कृषीमूल्य आयोगाकडे शेतकरी हिताचा कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे पण केवळ ऊसतोडी आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे वाढती महागाई बेरोजगारी शेतीमालाला भाव स्त्रियांचे संरक्षण उद्योगधंदे हे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे त्यांनी केवळ सत्ता टिकवण्यासाठी पक्ष फोडून लोकप्रतिनिधींना पळवले सत्ता स्थापन केली विविध कोर्टात ती टिकवली पण जनतेच्या कोर्टात ते टिकणार नाही एकही गद्दार या निवडणुकीत निवडून येणार नाही असा माझा विश्वास आहे कारण या लोकप्रतिनिधींनी जनतेचा अनादर केला आहे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर जनतेची कामे करण्यासाठी संपर्क असणे आवश्यक आहे हा संपर्क त्यांनी ठेवलेला नाही त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 24 तास जनतेची सेवा करत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील  एक कर्तबगार खासदार प्रतिमा निर्माण करून मतदार संघाच्या विकासाबरोबरच शेतकरी जनतेची काळजी घेत सर्व प्रश्न सोडवले जातील यासाठी आपण एकदा संधी द्यावी आवाहन त्यांनी शेवटी केले
शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील बोलताना म्हणाले लोकसभेला आम्ही निवडून दिलेले उमेदवार परत आमच्या संपर्कातच राहिले नाही तर ते जनतेच्या काय संपर्कात राहणार त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न सुटले नाहीत उलट विश्वासघात करून मत दिलेल्या जनतेचा अपमान करून आणि चिन्ह चोरून सत्तेत जाऊन बसले चोरलेले चिन्ह घेऊन ते आता जनतेच्या दारात येत आहेत मात्र त्यांनी केलेल्या चुकीला जनता माफ करणार नाही शिरोळ तालुक्यातील जनता विधानसभेच्या निवडणुकीत उल्हास पाटील यांना जेवढे मतदान केले तेवढे मतदान या लोकसभेच्या निवडणुकीत सत्यजित पाटील यांना देईल असा माझा विश्वास आहे या निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील गद्दारांना जनता या निवडणुकीत थारा देणार नाही सर्व घटकांवर अपयशी ठरलेले सरकार जनताच उलतावून टाकणार आहे
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांना शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मशाल चिन्ह घराघरात पोहोचवून आबांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जोपासली जाईल यासाठी केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनीच सत्यजित पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले
जयसिंगपूरचे माजी नगरसेवक पराग पाटील , शेतकरी चळवळीचे नेते यशवंत उर्फ बंटी देसाई , काँग्रेस किसान सेल कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रणजितसिंह पाटील , यांनी मनोगत व्यक्त केले .
      यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , उपनेते संजय पवार , शिरोळ तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे , दत्तचे संचालक शेखर पाटील , राष्ट्रवादी कॉग्रेस शरदपवार गट जिल्हा उपाध्यक्ष बी . जी माने , तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे , महिला अध्यक्षा स्नेहाताई देसाई शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे , जिल्हाप्रमुख मधुकर पाटील विकास पाटील काँग्रेसचे नितिन बागे , वृषभ पाटील , जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास गावडे , वसंतराव देसाई , माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे शिवसेना महिला आघाडीच्या साजिदा घोरी , डॉ . आरुणा माळी , शक्तीजीत गुरव रावसाहेब माने सतीश चव्हाण शंकर कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .
To Top