सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
निवडणूका आल्या कि रडणं अंन सांगण की मी याच मातीतला आहे मग आम्ही कुठल्या मातीतील आहोत असा प्रश्न उपस्थित करून आमच्या घराण्याने समाजसेवे साठी आयुष्य घालविले. तुम्ही म्हणजे आमच कुटुंब असून तुमचे जतन करण हे आमच कर्तव्य आहे असे छ उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.
मेढा येथिल प्रचार सभेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, सुनिल काटकर, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, सयाजी शिंदे श्रीहरी गोळे , हणमंतराव पार्टे, पांडूरंग जवळ, प्रकाश सुतार, सागर धनावडे, निर्मला दुधाने, कविता धनावडे आदी उपस्थित होते.
यावेळी उदयन राजे म्हणाले पिण्याच्या पाण्याचा , शेतीच्या पाणीचा पत्ता नव्हता अशा गंभीर परिस्थितीत येथिल लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई ठाणे सारख्या ठिकाणी विस्तापित झाले. पश्चिम महाराष्ट्र कॉग्रेसचा बालकिल्ला होता. पन्नास पंचावन्न वर्षे आपण त्यांना निवडून दिले. ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले त्याचा विश्वास घात कॉग्रेसने केला ते पुढे म्हणाले १९९५ ला मुंडे साहेबांच्या समोर विचार मांडल्यानंतर कृष्णा खोऱ्याची संकल्पना निर्माण झाली. ९९ मध्ये धरणांची , कॅनॉलची कामे सुरु केली नंतरच्या कालावधीत भाजप व मित्रपक्षाची सत्ता तुम्ही लोटून टाकली. तब्बल १५ वर्षे सत्ता नव्हती. परंतु त्यावेळी विद्यमान उमेदवारांकडे जलसिंचन खाते असताना महु हातेघर धरणाला किती निधी दिला. त्यावेळी कोणी हात बांधले होते का? लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी का निधी दिला नाही असे प्रश्न छ उदयनराजेंनी उपस्थित केले.
ते पुढे म्हणाले प्रतापगड कारखाना बंद पडला तेव्हा विद्यमान उमेदवारांचे कार्यक्षेत्र होत. आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो नसतो अन युतीचे सरकार नसते तर हा कारखाना सुद्धा तुमचा राहीला नसता तर तो गिळंकृत झाला असता असे सांगुन पुढे म्हणाले गैर व्यवहार केला नाही तर जामिनासाठी अर्ज का केला ? असा प्रश्न उपस्थित केला . कॉग्रेसच्या काळात घोटाळ्यांची लोकशाही होती. मोदीजींच्या माध्यमातून विकास होत आहे.
जयंत पाटीलांच्या वर टिका करताना छ उदयनराजे म्हणाले पारावरच्या बैठकीत बोलणारांनी आम्ही कुठ असतो म्हण्यापेक्षा तुम्ही कुठ आहात ते सांगा असा प्रश्न केला. तसेच स्वार्थापोटी एकत्र आलेल्यांना बाजुला ठेवा असा संदेश देत मोदींचे हात बळकट करण्यासाठी कळम चिन्हाचे बटण दाबून मतदान करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले ही निवडणूक स्थानिक पातळीवरील निवडणूक नसुन देशाचे नेतृत्व कोण करणार आहे देश हिताचे निर्णय कोण घेत आहे हे पहाणे गरजेचे आहे. जगामध्ये भारताची ओळख कशाप्रकारे अन कशामुळे झाली याचा विचार करणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदींचे सरकार आल्या पासुन एक घोटाळा दाखवून दया असे सांगत जो पैसा टॅक्स म्हणून जातो तो आपल्या पर्यंत परत येतोय. केंद्र सरकारच्या योजना थेट तुमच्यापर्यंत येत आहेत त्यासाठी कोणला भेटावे लागत नाही ही वस्तुस्थिती आहे.
ते पुढे म्हणाले भावनेच्या भरात निव्वळ भुमीपुत्र म्हणून चालणार नाही तर कोटयावधीचा निधी कोणी दिला याचा विचार होणे गरजेचे आहे. लोकसंखेचा विचार न करता आणि न मागता पाचवड ते चिपळून हा कोट्यवधी निधीचा रस्ता आपल्याला दिला हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे जे विकास करणार नेत्वृत्व आहे त्या मोदीजीं साठी कळमाला मतदान करणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
भाजपच्या सरकारने कोट्यावधीचा निधी दिला म्हणून मेढ्याचा कायापालट झाला. लोक म्हणतात भाजप मुस्लीमांच्या विरोधात आहे पण आज भाजपच्याच माध्यमातुन कब्रस्तानच काम झालेल आहे म्हणून भाजप ही मुस्लीमांच्या विरोधात नाही. ज्या वेळी निधी मागीतला त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजीत दादा असतील कोणी नाही म्हणाले नाहीत. कोट्यावधींची कामे भाजपच्या माध्यमातून झाली आणि पुढेही होणार आहेत. ज्यांनी आपल्याला भरभरून दिलेय त्यांना भरभरून देण्याची वेळ आली आहे असे आ. भोसले यांनी सांगितले.
आमचा संघर्ष असला तरी पक्षा बरोबर राहु दिलेला उमेदवार आपण सर्वांनी कळमला मतदान करून निवडून आणू. ज्या जावलीच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली त्यांना तुम्ही स्वाभिमान सांगताय ? छत्रपतींच्या घरण्याची मुहुर्त मेढ जावलीने रचली होती त्यामुळे आम्हाला कोणी स्वाभिमान सांगण्याची गरज नाही असे आ. भोसले यांनी सांगीतले.
जावलीचा एवढा कळवळा आहे भुमिपुत्र आहे तर विद्यमान उमेदवार हे विधान परिषदेचे आमदार आहेत तर त्यांनी किती निधी जावलीसाठी दिला हे सांगावे. पाच कोटी निधी मिळतो त्या तुन जावलीला काय दिल हे सांगावे असे आवाहन करून कमळाला मतदान करून मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन आ शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले.
यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी काश्मिरातील ३७० कलम हटविल्याने सर्व धर्मातील लोकांना न्याय मिळाला. ५०० वर्ष पूर्वीची श्रीराम मंदिर बांधले असे सांगुन आत्ताचे उमेदवार आहेत यांनी काय केले दुध संघ बंद केला. मार्केट कमिटी ठप्प केली असे शशिकांत शिंदेवर आरोप करीत डॉ भारत पाटणकराना सुपारी बाहाद्दराची उपमा दिली. देवेंद्र फडणवीस यांनी धरणाला मान्यता दिली असे सांगत ५ वेळा आमदारकी मिळाल्यावर खासदारकी कशाला पाहिजे प्रश्न विचारीत कृष्णा खोरेचे मंत्री असताना कोणते प्रकल्प आणले असे मानकुमरे यांनी उपस्थितांना केला. बरीच घर फोडली अस म्हणणारांनी सोनीया परदेशीचा मुद्दा घेवून कॉग्रेस पण फोडला होतीच ना हे सांगायला मानकुमरे विसरले नाहीत.
जिल्हा बॅक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी जावलीचा सुपुत्र म्हणणारांनी दहा वर्ष झाली जावलीचा पत्ता का लिहीला नाही कोरेगावचा का लिहीला ? असा प्रश्न उपस्थित करून महाराज साहेबांना ७० हजाराचे लिड द्यायचे आहे असे आवाहन केले. सौरभ शिंदे यांनी मॅच फिक्सिंग करणारांना बाजुला करा असे सांगताना मान गादीला आणि मत गादीलाच असे सांगीतले.