सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रदीप भगवान मांगडे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच पुणेचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी याबाबतचे पत्र मांगडे यांना देण्यात आले.
यावेळी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सतिश संकुडे, गौतम काकडे, adv. नवनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. अजित दादांनी दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन यापूढे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मांगडे यांनी सांगितले.