सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील वरंधा घाट वाघजाई मंदिरापर्यंत खुला रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार असून रायगड जिल्हा प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील महाड हद्दीत वाहतूक बंद केली आहे.वरंधा घाट रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाटात रायगड जिल्ह्यातील महाडच्या बाजूची सर्व वाहतूक ३० मे पर्यंत बंद राहणार आहे. मात्र पुणेच्या भोर हद्दीतून वाघजाई मंदिरापर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस विभागाकडून अहवाल मागिवल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवार दि.८ वरंधा घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे भोर मार्गे महाड व कोकणात जाता येणार नाही. मात्र वरंधा घाटातील भोरच्या हद्दीतील वाघजाई मंदिरापर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे.वाहनचालकांनी वरंधा घाटातून वाहने चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे भोर पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात आले आहे.