Baramati News l वेळेच्या आधी बिअरबार उघडला : बार मालकासह दोघांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता. बारामती येथील आनंद परमिट रूम बियर बार हे ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा लवकर उघडल्याने वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  
             शुभम सोमनाथ भांडवलकर रा. करंजे सोमेश्वर मंदिर ता. बारामती, सोमनाथ बाळासो पवार रा. करंजेपुल ता. बारामती व आनंद काशिनाथ दळवी रा. कापूरहोळ ता. भोर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी,
दि. २६ रोजी सकाळी १० वाजता  करंजेपुल गावचे हद्दीत लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने पेट्रोलींग करीत असताना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ अन्वये कलम ११ अन्वये वाईन व सर्व प्रकारचे मद्य विकी कणरी दुकाने (सकाळी ११/०० वा.ते पहाटे १२/३०
दुसरा दिवस) अशी वेळ ठरवुन दिलेली असताना वरील आरोपी यांनी आनंद बिअरबार परमिट रुम हे वर नमुद तारखेस वेळी चालु ठेवुन उघडुन लोकांना दारुची विक्री करीत असताना मिळुन आलेने त्यांनी शासनाचे
आदेशाचा अवमान केल्याने भा. दं. वि. क. १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
         पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव पी. के कन्हेरे पोलीस उपनिरीक्षक व डी.एस वारुळे सहा. पोलीस उपनिरीक्षक वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे हे करत आहेत.
To Top