सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
कृषि उद्योग मुल शिक्षण संस्थेच्या केयुएमएसएस खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था काऱ्हाटी, ता. बारामती येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना ( NAPS ) अंतर्गत कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस मुलाखतींमधे पुणे, शिरवळ, चाकण, भोसरी, रांजणगाव, मुंबई इ. ठिकाणच्या विविध 10 कंपन्यांनी आय. टी. आय. मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये प्रामुख्याने ब्रिटानीया, इनयांत्रा, बजाज इलेक्ट्रिकल्स, रेकेम, सेंच्युरीका, एच. पी. आर. सिनर्जी, जि. आय. सी., सि. ए. आय. टी. एज्युसिस्ट प्रा. लि, झेनिथ सर्वेअर, परांजपे ॲटो कास्ट आदी कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना अप्रेंटशीपकरीता मुलाखत देण्याची संधी मिळाली. कॅम्पस मुलाखतींसाठी आय. टी. आय. काऱ्हाटी कडुन सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संस्थेमधे अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस मेळाव्यात उत्स्फूर्तपणे नोंदणी केलेली होती. यामधुन एकुण 81 विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ऑफर लेटर देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अजित पवार साहेब, दशरथ धुमाळ, संस्थेच्या संचालिका सुनेत्रा पवार, खजिनदार सुभाष सोमाणी, सचिव प्रफुल्ल तावरे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. कॅम्पस मुलाखतींकरीता अधिक्षक महेश चांदगुडे, प्रशिक्षण अधिकारी स्वप्नील काळभोर, सर्व व्यवसाय अभ्यासक्रमांचे निदेशक, सर्व कर्मचारी यांचे योगदान लाभले असल्याचे संस्थेचे प्रशासक तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.विकास निर्मल यांनी सांगितले.