Baramati News l मोरगावला भिर्रर्रर्र....झाली आणि ५०२ बैलगाडामधून मुरूमच्या स्वप्नील साखरे यांची सुंदर-अर्जुनची बैलगाडी पहिली आली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी 
 मोरगाव( ता. बारामती ) येथे पीर साहेब यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत मुरूम येथील उद्योजक दीपक साखरे यांच्या श्री महालक्ष्मी प्रसन्न  स्वप्निल दीपक साखरे व बापू आंबेकर वडकी पुणे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे ७७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावत आदत हिंदकेसरी २०२४ चा किताब पटकावला.
            सुंदर आणि अर्जुन या बैलजोडीने अतिशय कमी वेळात अंतर कापत फायनल वर आपले नाव कोरले. मोरगावच्या यात्रेत राज्यभरातून सुमारे ५०२     बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. अतिशय पारदर्शक सुंदर नियोजनबद्ध शर्यती पार पडल्या. अभि तावरे, सुजित भोसले, चिलूशेठ नेवसे, संदीप नेवसे, समीर तावरे आणि शर्यत ग्रुप मोरगाव यांनी या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. सातकर ग्रुप कान्हेमावळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ४४  हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. नाथ साहेब प्रसन्न वीर येथील बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकावत ३३ हजार रुपयांचे बक्षिस मिळविले. घोटावडे ता. मुळशी येथील ग्रामपंचायत सदस्या निकीताई घोगरे यांच्या बैलगाडीने चौथा क्रमांक पटकावत बावीस हजार रुपये बक्षीस मिळवले. गुळूंचे येथील प्रदीप निगडे यांच्या बैलगाडीने पाचवा क्रमांक मिळवत ११ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. मयुरेश्वर प्रसन्न मोरगाव येथील सतीश तावरे यांच्या बैलगाडीने सहावा क्रमांक मिळवला. 
ओमसाईराम सृष्टी दीपक खरात लोणंद यांच्या बैलगाड्याने सातवा क्रमांक पटकावला. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून बैलगाडा शौकीन उपस्थित होते.
To Top