सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यात पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने विहिरीं,ओढे -नाल्यांची तळ गाठला आहे.दरम्यान परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाई तीव्र जाणवू लागली आहे.तर जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. लवकरात लवकर धोम- बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्याचा दक्षिण पट्टा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो.मात्र दक्षिण पट्ट्यातील बहुतांशी भाग हा खडकाळ व उताराचा असल्याने पावसाचे पाणी काही दिवसातच वाहून जाते.त्यामुळे दरवर्षी वीसगाव खोऱ्यातील दहा ते पंधरा तर चाळीसगाव खोऱ्यातील बहुतांशी गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.यंदा पावसाचे प्रमाणही कमी झाले होते.त्यामुळे ओढे - नाले, विहिरींना पाणी कमी होते. त्यातच यंदा कडक उन्हाळा पडल्याने एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.पाणीटंचाईमुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. त्याबरोबरच डोंगर रांगांमधील पडण्याचे जलस्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांची भटकंती मानववस्तीकडे तसेच शिवाराकडे अन्नपाण्याच्या अन्न पाण्याच्या शोधत सुरू आहे.
--------------------------------
धोम - बलकवडी धरणाचे आवर्तन सुटले तर पाण्याचा काळ हटेल
उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाणी पातळी घटले आहे. मात्र भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव चाळीसगाव खोऱ्याच्या डोंगररागांच्या कडेने धोम - बलकवडी धरणाचा उजवा कालवा पूर्वेकडे गेला आहे. या धरणाच्या कालव्याला रब्बीतील दुसरे आवर्तन सोडले तर कहार उन्हाळ्यातील काही काळ पाण्याचा प्रश्न मिटेल असे गोकवडी येथील शेतकरी बापू बांदल यांनी सांगितले.
COMMENTS