शिरोळ l पत्रकार चंद्रकांत भाट राज्यस्तरीय 'आत्मसन्मान' गौरव पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार चंद्रकांत भाट यांना संघर्षनायक मीडिया पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
            चंद्रकांत भाट हे गेली 24 वर्षे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिकपणे व निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करून समाजाच्या समृद्धीसाठी प्रयत्न सुरू ठेवले या कार्याची दखल घेऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे औचित्य साधून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संघर्षनायक मीडिया ग्रुप पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोल्हापूर यांच्यावतीने चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला संघर्षनायक मिडियाचे संस्थापक संतोष आठवले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जयसिंगराव कांबळे या मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत भाट यांना फेटा मानपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 
यावेळी डॉ विक्रम शिंगाडे बाळासाहेब कांबळे राहुल कांबळे शिरोळचे युवा उद्योजक अभिजीत माने मेजर प्रा काशिनाथ भोसले हणमत भाट संजयसिंह उर्फ संभाजी चव्हाण सुरेश गावडे संदीप माने सर्जेराव कांबळे सचिन सावंत तुषार उर्फ अदीक काळे पारस भाट आदिराज कोळी अथर्व भाट बाळासाहेब कांबळे विलास कुरणे प्रमोद ढाले अजित कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
To Top