Bhor News l संतोष म्हस्के l वरंधाघाट मार्गावर रस्ता बंदचा फलक नसल्याने वाहन चालकांना ४० किलोमीटरचा हेलपाटा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरंध घाटातील महाड (जि.रायगड) हद्दीत रस्ता ३० मे पर्यंत बंद केला आहे.मात्र भोरबाजूने वरंधा घाटात रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत रस्ता बंदचे फलक लावले नाहीत.परिणामी भोर बाजूने महाडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ४० किलोमीटरचा हेलपाटा पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
          वरंधा ता.भोर घाट  मागील वीस दिवसांपासून बंद झाल्याने मार्गावरील एसटी बसेस, खासगी वाहने बंद झाली आहेत.तर महाड बाजूकडे जाणाऱ्या तसेच भोरकडे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.तसेच घाट रस्त्यावर रस्ता बंदचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फलक लावले गेले नसल्याने बाहेरगावावरून महाडबाजूकडे जाणाऱ्या पर्यटक तसेच वाहनचालकांना महाड हद्दीत बंद असलेल्या रस्त्यापर्यंत जाऊन पुन्हा भोरला यावे लागत असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भोर येथील चौपाटी नजीक वरंधा घाट रस्ता बंद असल्याचा फरक लावले तर वाहन चालकांना घाटातून इजा करण्याचा त्रास होणार नाही असे कर्जत येथील प्रवाशाने सांगितले. तर लवकरच वरंधा घाट मार्गावर रस्ता बंद असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सदानंद हल्लाळे सोमेश्वर रिपोर्टरशी बोलताना म्हणाले.
--------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार
भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वरंधा घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद असल्याचा फलक लावने गरजेचे असतानाही फलक लावले गेले नाही.याचा परिणाम राज्यातील तसेच जिल्ह्यातील महाड बाजूकडे जाणाऱ्या पर्यटक वाहनचालकांना महाड हद्दीत बंद असलेल्या रस्त्यापर्यंत जाऊन पुन्हा भोरला आर्थिक भुर्दंड सहन करून यावे लागत असल्याने डबल प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.
To Top