पुरंदर l बारामती लोकसभेचे अपक्ष उमेदवार राजेंद्र बरकडे यांचा काँग्रेसचा राजीनामा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
काँग्रेस ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र बरकडे हे स्वतः लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत.ते काँग्रेसचे असुन सुद्धा त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे गेला.
             खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.अशी राजकीय परिस्थिती असताना सुद्धा सामान्य कुटुंबातील व्यक्तीने निवडणुकीच्या रिंगणात का उतरू नये हा आक्रमक पवित्रा घेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र बरकडे  यांनी ते स्वतः काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणूक आयोगाकडून त्यांना स्पॅनर( पाना) हे चिन्ह मिळालेले आहे.काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून राजेंद्र बरकडे यांनी
महाविकास आघाडीचा धर्म पाळणे अपेक्षित होते.परंतु 
या भानगडीत पडून न राहता व आपल्या मुळे काँग्रेस पक्षाकडे बोट जाऊ नये म्हणून अखेर काँग्रेसचे अपक्ष उमेदवार राजेंद्र बरकडे यांनी स्वत हून काँग्रेस ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्ष आणि सदस्य पदाचा राजीनामा देत स्वतःलढण्याची मोकळी वाट करून घेतली आहे.
कॉग्रेस ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांच्याकडे हा राजीनामा पाठविला आहे.
पदमुक्त कऱण्यात यावे.अशी विनंती सुद्धा राजेंद्र बरकडे यांनी केलेली आहे 

राजीनामा पत्रात राजेंद्र बरकडे यांनी असे म्हटलेले आहे की,मी अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता ते पुणे जि.काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष पदापर्यंत काम करत आलो असुन आतापर्यंत मी पक्षाचे निष्ठेने काम केले आहे.माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे काँग्रेस पक्षाची कोणतीही हानी होऊ नये.या कारणास्तव मी माझ्या काँग्रेस पक्षाचा पुणे जि.काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्त करत आहे.तरी आपण माझ्या अर्जाचा विचार करून पदमुक्त करावे.अशी विनंती सुध्दा राजेंद्र बरकडे यांनी केलेली आहे.राजेंद्र बरकडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,पुणे जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा महाराष्ट्र प़देश कॉग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष आदरणीय भानुदास माळी साहेब यांच्याकडे सुपूर्त केला असुन आजपर्यंत जेवढं संघटन वाढवायचा प्रयत्न करायचा तेवढा केला आहे इथुन पुढे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे.
To Top