सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात बुधवार दि.१० पासून सुरू असलेल्या महविकास आघाडी बारामती लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे( चिन्ह- तुतारी) यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.प्रचारात महाविकास आघाडी ,मित्रपक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.
वीसगाव खोऱ्यात बुधवार दि.१० वरवडी बुद्रुक, वरोडी डाय,वरोडी खुर्द, पाले, पळसोशी, उदनखानवाडी ,धावडी ,मानकरवाडी ,बाजारवाडी येथे प्रचार केला गेला. गुरुवार दि.११ पोळवाडी, जेधेवाडी, निळकंठ, गोकवडी ,नेरे, बालवडी, आंबाडे ,कोळेवाडी या गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.तर वडगाव ,उत्रोली, वेनवडी,शिरवली, भाबवडी, हातनोशी, खानापूर येथील गावांमध्ये शुक्रवार दि. १२ प्रचार करण्यात येणार आहे.प्रचारात कार्यकर्त्यांनी उस्फुर्तपणे झोकुन दिले असून गावोगावी शेकडोहून अधिक मित्रपक्ष पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील झाले आहेत.आमदार संग्राम थोपटे व शिवसेना (उबाठा गट )कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणेत युवा नेते पृथ्वीराज थोपटे, राजगड संचालक उत्तम थोपटे,युवा उद्योजक अनिल सावले,खरेदी विक्री संघ चेअरमन अतुल किंद्रे,संचालक संपत दरेकर, दिलीप वरे ,मधुकर कानडे,प्रकाश म्हस्के,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट कार्याध्यक्ष संदीप नांगरे,सुरेश धोत्रे,तुकाराम साळवी,माजी सरपंच प्रमोद थोपटे, भरत बांदल,शिवाजी सासवडे,शाम जेधे,बापू बांदल आदींसह शेकडोहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.