Baramati News l बलात्कार, ॲट्रॉसिटी व पोस्को मधील आरोपीची निर्दोष मुक्तता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने भक्कम पुराव्या अभावी एकाची अट्रोसिटी सह  बलात्कार व पोस्को च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
          सविस्तर हकीकत अशी की, सुनील गोफणे राहणार दीपनगर काटेवाडी, यांचे विरुद्ध वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 07/03/2019  रोजी भारतीय दंड विधान कलम ३६६, ३६३,३७६ पोस्को ॲट्रॉसिटी अशा विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर सदर गुन्हा पीडितेच्या आईने दाखल केला होता.
आरोपीला दिनांक 15/3 /2019 रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने तदनंतर जामीन दाखल केले परंतु पीडित हिने प्रत्येक वेळेस जामीनाला विरोध केला व पीडितेचे वय तेरा असल्या कारणामुळे आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने देखील नामंजूर केला होता.
       सदर प्रकरणात फिर्यादी पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले त्यापैकी एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. पीडित व तिचे आई-वडील, तीन सरकारी पंच ,एक डॉक्टर ,आणि दोन तपास अधिकारी असे एकूण ९ साक्षीदार तपासले गेले, कोणत्याही साक्षीदार फितूर नव्हता परंतु उलट तपासात काही महत्त्वपूर्ण बाबी साक्षीदारांकडून कोर्टापुढे आल्या. पीडितेचे तिचे लग्न जमले होते पण ते आरोपीमुळे मोडले तसेच पीडित व आरोपी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत व त्याचा राग पीडितेच्या  घरच्यांना होता व ते एफ आय आर दाखल करण्याचे मुख्य कारण आहे असे न्यायाधीशांसमोर  आले.
    वैद्यकीय अहवाला देखील पीडिता हिला, जखमा , दुखापत दिसून आल्या नाहीत पण संभोग केल्याचे दिसून आले असा निष्कर्ष वैद्यकीय अहवालात कोर्टासमोर आला.
तपास अधिकारी यांनी तपास केला परंतु आरोपी यांनी गुन्हा केला आहे याबाबत भक्कम पुरावा दोषराव पत्रात देता आला नाही. सुनावणी अंती फिर्यादी पक्षाने त्यांची बाजू साबित करू शकले नाहीत व आरोपीने घेतलेला बचाव ग्राह्य धरून सदर सत्र न्यायाधीश श्री. जे.ए शेख यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले.
 आरोपींच्या वतीने ॲड. प्रसाद खारतोडे यांनी काम पाहिले व त्यांना सहाय्य, ॲड. प्रीती शिंदे  ॲड संतोष येडे, ॲड.अनिश शिंदे,ॲड.सिद्धेश नेवसे यांनी केले.
To Top