पुरंदर l नीरा येथे रमजान ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा ( ता.पुरंदर) येथे  गुरूवारी (दि.११) मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान थोरांनी एकत्र येत मोठ्या श्रध्देने सामुदायिकरीत्या नमाज पठन केले .त्याग, सदभावना आणि मनशुद्धी करणा-या रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत  शुभेच्छा दिल्या. 

        नीरा येथील  स्टेशन मस्जिद येथे मौलाना हाफीज मेराज यांनी प्रवचन करीत हजरत मोहंम्मद पैगंबरांच्या आठवणींना उजाळा देऊन  सामुदायिक नमाजपठन  केले तर हाजी हाफिज फत्तेहमोहंम्मद एज्युकेशनल ट्रस्टच्या ईदगाह मैदानात हाफिज मुज्जम्मिल तसेच अंजुमन तालीमुल कुरआन निरा वार्ड नं.२ येथील मस्जिद मध्ये मौलाना उबादा शेख यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले. यावेळी नीरा व परिसरातील मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्या उन्नती, शांतता आणि एकात्मतेसाठी दुवा करण्यात आली. तसेच मोहंम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यात आला. 
              यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये दत्ताजी चव्हाण, उपसरपंच राजेश काकडे, नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य  संदीप धायगुडे,  अँड.पृथ्वीराज चव्हाण, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार  सोमनाथ पुजारी ,  सहाय्यक फौजदार संदीप मोकाशी , डॉ.वसंतराव दगडे, दिपक काकडे, अमोल साबळे, राजेंद्र बरकडे, आदींनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------------------------------
To Top