Daund News l केडगावला बंद घरात चोरट्यांचा धुमाकूळ : रिव्हॉल्व्हरची जिवंत काडतुसे व मोकळी काडतुसे पळवली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
केडगाव : प्रतिनिधी
 दौंड तालुक्यातील केडगाव येथे शुक्रवारी व शनिवार च्या मध्यरात्री चौफुला येथें सराफी दुकान असलेले  व केडगाव येथे राहत असलेले व्यापारी गणेश भगवान लोळगे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते .रात्री १-५५  वाजता ते घरी आले असता कंपाऊंड गेट जवळ एक व्यक्ती उभा दिसला त्यांचा मुलगा कोण आहे रे .येथे काय करतोस.  असे विचारताच त्याने कंपाऊंड च्या विरुद्ध बाजूच्या भिंतीवरून उडी मारून गेला बाकी चोरटे यानी घरातील कपडे लत्ते उचकटले घरातील चांदीच्या मोडी च्या अंदाजे ४०० ग्राम पट्ट्या तसेच रिव्हॉल्व्हर ची १० जिवंत काडतुसे व २० मोकळी काडतुसे चोरीला गेली आहेत.
    घर मालक त्यांचा मुलगा व ड्रायव्हर यानी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटयांनी मोठे कटर,दांडके स्क्रू ड्रायव्हर तेथेच टाकून पळून गेले.घरा मालकाने एका चोरट्याला दगड देखील मारला व तो त्याला मानेजवळ लागला देखील आहे तरी देखील चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
त्यांचा मुलगा डॉक्टर सौरव याने चोरट्यांचा पाठलाग केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळी केडगाव पोलिसांनी रात्रीच भेट दिली असून पुढील तपास केडगाव पोलीस करीत आहेत. या अगोदर देखील लोळगे यांच्यावर हल्ला करून चोरटयांनी रिव्हॉल्व्हर पळवले आहे .ते दुकान बंद करून चौफुल्यावरून केडगाव ला जाताना त्यांचेवर हल्ला झाला होता.
To Top