सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिण तसेच पश्चिम पट्ट्यातील आंबवडे ,नेरे , निगुडघर परिसरात सोमवार दि.१५ सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार सिडकाव झाला.पावसात जनावरांचा चारा तसेच अनेकांच्या वीटभट्ट्या भिजून नुकसान झाले.
तालुक्यात मागील चार दिवसांपासून सकाळपासूनच ढगाळ हवामान तयार होत होते. सायंकाळच्या वेळी अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे होती. सोमवार दि.१५ पश्चिमेकडील तसेच दक्षिण भागात सायंकाळी ढगांचा गडगडाट सुरू होऊन अवकाळी पावसाचा शिडकाव झाला.बहुतांशी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी वाळवून ठेवलेल्या चारा भिजला तर अनेक वीटभट्टी मालकांच्या वीटभट्ट्या भिजल्याने मोठे नुकसान झाले.तर भोर-आंबाडखिंड मार्गावर अनेक दुचाकी वाहनचालक चिखलमय रस्त्यावर घसरून पडल्याने अनेकांना दुखापती झाल्या.अवकाळी पावसावेळी परिसरात वारे जोरदार असल्याने अनेक ठिकाणची झाडेझुडपे उन्ममळून पडली.अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात काही वेळ थंडावा जाणवला.मात्र काही तासांनी उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक गर्मीने हैराण झाले होते.
COMMENTS