सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
पाटबंधारे खाते, महावितरण खाते व शेजारील आठ शेतकरी यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर चित्रण करत विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हनुमंत पांडुरंग सणस वय ६० रा.लाटे ता. बारामती असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटे येथे शेतकऱ्याने पाटबंधारे विभाग महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्या मध्ये सर्व हाकिकत सांगितली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस याचे रान मोकळे केले.
त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली.
या भितीला भिऊन हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे असे त्यांचे भाऊ जयवंत सणस यांनी सांगितले आहे.