सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई पोलीस ठाणेचे हद्दीमधुन गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करुन शोध घेण्याच्या सुचना वाई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तपास पथकास दिल्यानंतर सीईआयआर पोर्टलचे माध्यमातुन वाई पोलीस ठाणेचे हद्दीतुन गहाळ झालेले मोबाईल फोनचा निरंतर शोध घेतला असता, आयफोन, समसँग, सारख्या नामांकित बॅण्डचे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे १७ मोबाईल फोनचा विविध ठिकाणाहुन शोध घेऊन सदरचे मोबाईल फोन मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस सहा पोलीस निरीक्षक वैभव पवार, उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज, पोलीस पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांनी केली आहे.
COMMENTS