सोन्याची झळाळी वाढतच राहणार..! तोळ्याला ७५ हजार रुपयांचा टप्पा पार होण्याची शक्यता : किरण आळंदीकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : महेश जगताप
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, बँकांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरामध्ये कपात करण्याचे केलेले सुतोवाच, आणि अशातच इराण ने इस्त्राईल वर केलेला हल्ला सोने चांदीच्या बाजारभावाचा नवीन ऊचांक करण्यास कारणीभूत ठरेल.
        जगात जेंव्हा कोणत्याही देशांमध्ये युद्ध्सदृश परिस्थिती निर्माण होते, दोन देशांमध्ये भू राजकीय तणाव निर्माण होतो त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, मागणी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पर्यायाने सोन्याचे भाव वाढतात असे इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ( इब्जा ) चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
शुक्रवारी इराण ने इस्त्राईल वर हल्ल्याची तयारी केली असे समजताच सोन्याच्या बाजारभावाने उसळी घेऊन 24 K सोन्याचा भाव 1 तासात 72 हजार वरून वाढून 73500 इतका झाला होता.. परंतु अमेरिकेने मध्यस्थी केल्याने, दोन देशातील तणाव निवळला होता.. तणाव निवळल्यामुळे रात्रीतून पुन्हा सोन्याचे भाव जैसे थे होऊन 72 हजारांवर स्थिरावले होते..पण आता तणाव पुन्हा वाढल्याने शनिवार, रविवार भारतीय बाजारपेठ बंद असल्याने परिणाम दिसून येतं नसले तरी सोमवारी मात्र सोन्याचे बाजारभाव 75 हजारांचा टप्पा पार करण्याची तर चांदी मध्ये हि मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले..
पुढील आठवड्यात शेअर बाजारात जर घसरण झाली तर त्याचा हि परिणाम सोने - चांदीच्या भाव वाढीवर होऊ शकतो.
परंतु जर चर्चेतून किंवा इतर देशांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला किंवा भू - राजकीय तणाव निवळला सोन्याचे बाजारभाव 71 हजार रु. तोळ्याच्या आसपास आणि चांदी चे बाजारभाव 83 हजार रु. किलो च्या आसपास स्थिरावतील असे हि आळंदीकर यांनी सांगितले.
-----------
ज्या ग्राहकांना आपल्या घरातील लग्न कार्यासाठी सोने खरेदी करायचे आहे किंवा गुंतवणूक करायची आहे अशा ग्राहकांनी ज्या दुकानात सोने बुकिंग ची सुविधा असेल तिथे ठराविक रक्कम भरून दागिने किंवा सोने बुकिंग केले तर ग्राहकांना सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले तरी नुकसान होत नाही असे पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे संचालक शुभम आळंदीकर यांनी सांगितले. 
To Top