सुपे परगणा l दिपक जाधव l कर्मचाऱ्यांना प्रचारात उतरवणे यापेक्षा दुसरी नामुष्की कोणती : आमदार रोहित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव
बारामती लोकसभा मतदार संघात जरांडेश्वर, दौंड शुगर आणि अंबालिका आदी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना प्रचारात उतरावे लागणं यापेक्षा दुसरी नामुष्की कोणती आहे असा जोरदार हल्ला आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर केला. 
        सुपे ता. बारामती येथे आमदार रोहित पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. एस. एन. जगताप, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, माजी सभापती पोपटराव पानसरे, संजय पोमण, संपतराव काटे, सुरेश भोसले,  
       येथील जनतेवर विरोधकांचा विश्वास राहिला नाही, म्हणुन प्रचारासाठी बाहेरुन माणस आणावी लागत आहेत. अशी नामुष्कीची वेळ विरोधकांवर आली असल्याचे पवार यांनी सांगितले. 
      यावेळी शेतकऱ्यांच्या कांदा, सोयाबिन तसेच दुध आदी उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. मात्र त्या पटीत शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमती दुप्पट व तिप्पट वाढल्या आहेत. याकडे सरकार डोळेझाक करीत आहे असा जोरदार हल्ला पवार यांनी विरोधकांवर चढवला.
          महाराष्ट्रातुन सुमारे १२ लाख कोटीची गुंतवणुक गुजरातला पळवली. येथील कारखानदारी अडचणीत आली. येथील मुलांना नोकऱ्या नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीतुन बीजेपीला महाराष्ट्रातुन हद्दपार केले पाहिजे असा घणाघात पवार यांनी यावेळी केला. 
          .........................................
To Top