सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
तेलंगणात नद्यांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी १ लाख अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उचलुन परिसरातील तलाव भरण्यात येतात. त्याचप्रमाणे येथील नद्याद्वारे ओव्हरफ्लो होणारे पाणी बारामती, पुरंधर, इंदापुर आणि दौंड या जिरायती भागातील ओढे व परिसरातील तलावाकडे सोडणार असुन त्यासाठी लागणारी वीज ही सोलवर तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सुपे येथील पुजा गार्डन मंगल कार्यालयात महायुतीचा संवाद मेळावा झाला. याप्रसंगी पवार बोलत होते.
याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब गावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी सभापती दिलीप खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुका दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, सरपंच तुषार हिरवे, भरत खैरे, शौकत कोतवाल, ज्ञानेश्वर कौले, बी. के हिरवे, सुशांत जगताप, आप्पासो शेळके, माजी सभापती संजय भोसले, शारदा खराडे, अविनाश गोफणे, संजय दरेकर, बापुराव चांदगुडे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्यावतीने महायुतीच्या उमेदवारास जाहिर पाठींबा देण्यात आला.
कोणतीही विकास कामे करायची झाल्यास केंद्राकडुन ५० टक्के निधी राज्यासाठी आणावा लागतो. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यास विकास कामे करण्यास अडचण येत नाही. त्यामुळे नुसते भावनिक होवुन कामे होते नाही. तर त्याला विकास कामेच करावी लागतात. मागिल दहा वर्षात सद्याच्या खासदाराने कोणतीही विकास कामे आणली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले की आज येथे आलेले काही कार्यकर्ते विरोधकांच्या सभेला उपस्थित होते हे चालणार नाही. विरोधक सद्या गावो गावी जावुन सभा घेत आहेत. कुठ जेवन, कुठ नाष्टा तर कुठ चहा घेण्यासाठी थांबत आहेत. पुर्वी तालुक्यातुन एकच सभा घेत होते. मात्र आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.
अजुनही आपल्याला विमानतळ, टर्मिनल, बारामती - फलटण रेल्वे तसेच बारामती पर्यंत पुण्याची लोकल आणाची आहे. अशी अनेक विकास कामे येत्या पाच दहा वर्षात करायची आहेत. या सरकारकडुन सोयाबिन, कांदा आणि दूधाला अनुदान दिले जात आहे. यामध्ये आचारसहिंता संपल्यावर कांदा निर्यातीचा विषय मार्गी लावला जाईल. हर घर नल योजना ही मोदींजींनी आणली. त्यांच्या शिवाय विकास कामे होणार नाहीत त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडुन द्या असे आवाहन पवार यांनी केले.
दादा तुमची पिलावळ आवरा....
गावा गावात बोलल जात की दादा तुमच काही नाही हो. पण तुमची पिलावळ आवरा असा सुर अनेक ठिकाणी काढला जातो. पण एक लक्षात ठेवा या निवडणुकीत तुम्ही मला म्हणजे बायकोला मतदान करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत पिलावळांना त्यांची त्यांना जागा दाखवु ना असा टोला लगावला.
पवार म्हणाले, तुम्ही मला ३० - ३५ वर्षे प्रेम दिले आहे. मी देखील विकास कामाना महत्व देत आहे. यापुढे देखील असेच प्रेम दाखवाल, याची मला खात्री आहे. त्यामुळे माझीही जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे सासूचे चार दिवस संपलेत. आत्ता चार दिवस सूनचे सुरु झाले आहेत असेही पवार यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी वासुदेव काळे, ज्ञानेश्वर कौले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिलीप खैरे यांनी केले. तर सूत्रसंचालन पोपट खैरे यांनी केले.
..................................