सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मीनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच सांगता करण्यात आली, भैरवनाथ यात्रेनिमित्त मार्गासनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, शनिवार दिनांक १३ एप्रिल पासून गेली सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये रामभाऊ रेणुसे,निलेश पानसरे, पप्पू मोरे ,तुकाराम वालगुडे,धोंडीबा खाटपे, मारुती वालगुडे, यांची प्रवचने झाली तर कृष्णा लिम्हण, वैभव नलावडे,मयूर कोंडे, दत्तात्रेय मांढरे,रोहिदास डिंबळे,मच्छिंद्र कुंभार,लाला बढे व काल्याचे किर्तन नवनाथ महाराज मांजरे यांची झाली, तसेच रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते रात्री दोन पर्यंत काठीचा पालखी सोहळा रंगणार असून रात्री ढोल लेझीमच्या स्पर्धा घेण्यात येतील सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात येईल व सायंकाळी जंगी कुस्त्यांचे मैदान भरविले जाणार असून या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून पैलवान मंडळी हजेरी लावत असतात तालुक्यातील सर्वात मानाची समजली जाणारी यात्रा असते त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणे यात्रेसाठी येत असतात, यात्रेसाठी गावातील तरुण मंडळ ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात,
COMMENTS