सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुणे जिल्हा आम आदमी पार्टीच्या युवा संघटनेच्या अध्यक्षपदी महेश जेधे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नुकतेच आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, व जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यापूर्वी महेश जेधे आम आदमी पार्टी पुरंदर तालुका युवा अध्यक्षपदी कार्यरत होते. आंबेगाव येथे झालेल्या कार्यक्रमा वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाने दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन यापुढे संपूर्ण पुणे जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे महेश जेधे यांनी यावेळी सांगितले.