सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे.दादा सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असतात.बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना एकदा खासदारकीची संधी द्या, संधीचे सोने करून दाखवू असे भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात खानापूर येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय अजित पवार बोलत होते.
गावभेट दौऱ्यात विसगाव खोऱ्यातील भाबवडी, खानापूर, पोळवाडी, आंबाडे ,पळसोशी ,वरवडी धावडी ,बाजारवाडी या गावातील मतदारांशी जय पवार व महायुतीतील पहिल्या फळीच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,विक्रम खुटवड,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,समीर घोडेकर,महिलाध्यक्षा विद्या पांगारे, मनोज खोपडे,अविनाश गायकवाड,सचिन पाटणे,नितीन थोपटे,प्रवीण जगदाळे,राजेंद्र थोपटे,संपत तनपुरे,रोहन भोसले,अनिकेत कोंढाळकर, दत्ता थोपटे,सुनील साळवी, चंद्रकांत बाठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जय पवार पुढे म्हणाले विरोधक अनेक वर्ष खासदार असतानाही त्यांनी औद्योगिक वसाहत आणलेली नाही.भोर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळून रोजगार मिळण्यासाठी स्वतः लक्ष घालून औद्योगिक वसाहत प्राधान्याने आणणार आहे.
COMMENTS