खंडाळा l एक देशी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व मोटार सायकलसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत : शिरवळ पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप निरीक्षक सतीश आंदेलवार व पोलीस ठाणेचे अंमलदार असे शिरवळ पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, शिरवळ गावचे हददीत पळशी रोडला दोन संशयित इसम धनलक्ष्मी रेसिडेंटच्या पार्किंग आवारात संशयीतरित्या फिरत आहेत. 
         अशी माहिती प्राप्त शिरवळ पोलीस ठाणे स्टाफसह मिळाले बातमीचे ठिकाणी पोहचले, त्यावेळी तेथे होन्दा युनिफॉर्न मो.सा.क्र. एम.एच.०२ डी.डी. ५९३० या गाडीवर बसून होते. त्या इसमांची हालचाल संशयास्पद जाणविल्याने त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचे हावभाव व हालचाली संशयास्पद वाटुन त्याचे जवळ असले कापडी पिशवी दिसुन आली तेव्हा त्या पिशवीची पाहणी केली असता त्या मध्ये १ लोखंडी स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मोटार सायकल असे सुमारे १ लाख २० हजार ४०० रुपये किमतीचा मुददेमाल मिळुन आला. आरोपी दिपक संतोष पाटणे वय २२ वर्षे, रा. विंग ता. खंडाळा, जि.सातारा, ओम सतिष कदम वय १९ वर्षे, रा. लोणी ता. खंडाळा, जि.सातारा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
To Top