सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात ठाकरे गटाचे माजी जिल्हा संघटक यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला असला तरी मूळ उबाठा गटाचे शिवसैनिक जागेवरच असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच राहणार आहे.अशी माहिती भोर तालुका पश्चिम विभाग प्रमुख हनुमंत कंक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भोर येथे उध्दव ठाकरे गट कार्यकर्ते गंगुताई पंतसचिव वाचनालयातील पञकार परिषदेत कंक बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हनुमंत कंक, विजय भिलारे ,रामचंद्र बोडके, विष्णू दानवले,दशरथ पिलाणे, विकास बांदल,अमोल बरदाडे,गोरख पवार,शंकर जाधव निलेश बांदल अनिल भेलके,अतुल अगणे,प्रमोद जगताप,नारायण मोरे शिवाजी शिंदे,लक्ष्मण प्रधान,काका काटकर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून सुरुवातीपासूनच आम्ही महाविकास आघाडीचे काम करीत आहोत आणि यापुढेही कडवा शिवसैनिक सुप्रिया सुळे यांच्या बरोबरच राहणार आहे.कोन शिवसेना सोडुन गेले त्याचा काही परिणाम शिवसेनेवर झालेला नाही.मुळ शिवसैनिक आणि पदाधिकारी आपल्या जागेवरच आहेत असा विश्वास शिवसेना कार्यकत्यांनी व्यक्त केला.