Bhor News l व्यायाम करताना भोलावडेतील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
सकाळी लवकर उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या भोलावडे ता.भोर येथील एका २१ वर्षीय तरुणाचा पद्मावती हॉटेल समोर व्यायाम करत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.अजय काळू भोसले(वय २१ वर्ष, रा. भोलावडे ता.भोर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत संजय सुरेश भोसले(वय २५ वर्ष, रा. आंबेडकरनगर, भोलावडे ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात खबर दिली. 
       भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय भोसले आणि मयत अजय भोसले हे व्यायाम करण्यासाठी शुक्रवारी(दि. १९ एप्रिल) भोलावडे येथील पद्मावती हॉटेल समोर थांबले होते. त्यानंतर मयत अजयने सात-आठ जोर मारले व थोडा व्यायाम केला. आणि तो अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यानंतर संजय याने लागलीच अजयच्या नातेवाईकांना कळवून त्यास भोर येथील हरजीवन हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. तेथील डॉक्टरांनी अजयला तपासून भोर मधील सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो उपचारपूर्वी मृत झाल्याचे घोषित केले. भोर पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.१९ उशिरा या मृत्यूबाबतची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार वर्षा भोसले करीत आहेत.
To Top