सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, संशयित आरोपी हा बावधन नाका परिसरात येणार असुन, त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना देण्यात आल्याने वाई तपासपथकाने बावधन नाका परिसरात सापळा रचुन एका संशयित इसमास वाहन क्र एमएच ११ सीवाय ७८२७ हिच्यासह ताब्यात घेतले तेव्हा संशयित इसमास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ प्रितम सुनिल शिंदे रा गंगापुरी ता वाई जि सातारा असे सांगुन सदरचे वाहन त्याने वाई मंडई येथुन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे अधिकची विचारपसु करता, त्याने दिनांक ०७/०४/२०२४ रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथुन काळ्या रंगाची स्पेल्डर क्र एमएच ११ बीजे ०६१० ही देखील चोरी केल्याचे सांगितल्याने सदरबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ३५७/२०२४ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदरच्या ०२ मोटारसायकल त्याच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत. असा एकुण ०१ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ०२ मोटारसायकल त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक वैभव पवार पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज पो.ना राहुल भोईर पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.