सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
माळेगाव (ता.बारामती) येथील निरंजन महेंद्रसिंह राजे जाधवराव यांनी युपीएससी परीक्षेमध्ये २८७ रँक मिळवून यश संपादन केले.त्यांच्या यशाबद्दल माळेगावसह बारामती तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.सोमेश्वरनगर,येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक महेंद्रसिंह राजे जाधवराव यांचे निरंजन हे चिरंजीव आहेत.आपल्या यशाबद्दल निरंजन म्हणाले,अभ्यासात सातत्य असेल आणि जगात घडणाऱ्या चालू घडामोडी ज्ञात असतील तर यश नक्की मिळते,यामध्ये त्यांनी आपले आई - वडील,शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मित्र परिवाराचे सहकार्य याबद्दल आभार व्यक्त केले.तर शासकीय सेवेच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे नमूद केले.तर राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांनी या परीक्षेची भीती न बाळगता मनापासून व खडतर प्रयत्न करून अभ्यास केल्यास त्यांनाही यश मिळेल असे मत व्यक्त केले.