भोर : प्रतिनिधी
निर्भय व्हा मतदानाचा हक्क बजावा असा संदेश देत भोर शहरात जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भोरच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी विद्यालयातील शिक्षक सुजित चव्हाण तसेच संदेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सर्वत्र फिरून मतदान जनजागृती केली.अभियानात विद्यालयातील भूमिका खोपडे, ऋतिका किवळे, सिद्धी म्हस्के, मानसी गायकवाड ,श्रेया खोपडे आदींसह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.