सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

लोकसभा रणसंग्राम..... l शक्तीप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. 
       याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व  आमदार सचिन अहिर, सुषमा अंधारे, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. 
       सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे." 
तत्पूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7086,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : लोकसभा रणसंग्राम..... l शक्तीप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल
लोकसभा रणसंग्राम..... l शक्तीप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg8osrz9wuis9qIRFl5aytoi0qlpXz5h1qncu8OxZ192GJo0ojjyjbJMogsHgaXNPUnn7bctnJeHyzkm_d_6RIjlSdhdYopfHeEw5B02do8Rb-V9gLbOyjeWOmM06nJ3z7vTh0P2Fw8wb_bUffYELhm2gpD4n-xi20WZNZJ6NsOUElUDRkkYjb2q0QZxdZn
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg8osrz9wuis9qIRFl5aytoi0qlpXz5h1qncu8OxZ192GJo0ojjyjbJMogsHgaXNPUnn7bctnJeHyzkm_d_6RIjlSdhdYopfHeEw5B02do8Rb-V9gLbOyjeWOmM06nJ3z7vTh0P2Fw8wb_bUffYELhm2gpD4n-xi20WZNZJ6NsOUElUDRkkYjb2q0QZxdZn=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/04/l_18.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/04/l_18.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy