सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी बरोबर काम करणारे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक कुलदीप कोंडे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने भोर तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भोर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक कुलदीप कोंडे यांनी पुणे येथे शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.