सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात रामनवमीनिमित्त कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी आलेल्या उत्रोली ता.भोर येथील केशव धर्मेंद्र शिंदे (वय -१८) या तरुणावर जुन्या वादाच्या कारणावरून भोलावडे ता.भोर येथील रोहित जाधव व इतर दोन अज्ञात इसमांनी डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली.जखमी तरुणास तात्काळ भोर पोलिसांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. १७ केशव धर्मेंद्र शिंदे रा.उत्रोली व त्याचे दोन मित्र असे तिघेजण भोर शहर येथे रामनवमी यात्रा कुस्ती आखाडा पाहण्यासाठी आलेले होते. तेव्हा जुन्या वादाच्या कारणावरून इसमनामे रोहित जाधव रा. भोलावडे व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम असे येऊन सम्राट चौक येथे लोकांच्या गर्दीत अंधारामध्ये रात्री साडेसातच्या वाजताच्या सुमारास केशव शिंदे यांचे डोक्यात कोयत्याने दोन ते तीन वार करून जखमी केले.जखमीवर हरजीवन हॉस्पिटल येथे उपचार चालू असून प्रकृती स्थिर आहे.सदर घटनेबाबत भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.