सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा-मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी येथे रस्त्याच्या कडेला मेंढ्या चारत असलेल्या मेंढपाळाला मारहाण करत मेंढ्या पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत मेंढपाळ सोनबा नामदेव दगडे वय 30, व्यवसाय- मेंढपाळ रा. चौधरवाडी, दगडेवस्ती ता. बारामती, जि.पुणे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन तृतीयपंती, दोन पुरूष इसम, एक महीला ( नाव पत्ता माहीत नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन तृतीयपंथीना अटक करण्यात आली आहे. दि. 17/04/2024 रोजी दुपारी १ वाजता चौधरवाडी ता.बारामती जि पुणे गावचे हददीत निरा मोरगाव रोडचे कडेला चौधरवाडी घाटाचे जवळ हा प्रकार घडला. यामध्ये ३८ हजार किंमतीच्या मेंढ्या चोरीला गेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील शेळया मेढंया चारत असताना स्कारपिओ गाडी नंबर एम.एच/06/ए.एन/7806 यामधुन वरील वर्णनाचे दोन तृतीयपंती, दोन पुरूष इसम, व एक महीला असे यांनी येऊन फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांना हाताने लाथाबुक्यांनी व दगडाने मारहान करून जबरदस्तीने फिर्यादीची वरील वर्णनाची एक शेळी व एक बोकड स्कारपिओ कारमध्ये भरून दरोडा टाकुन घेऊन गेले आहेत तसेच दुपारी 03.30 वा चे सुमारास वरील वर्णनाचे पाचही जनांनी सोनबा दगडे यांचे चुलते गुलाब मारूती दगडे हे त्यांचे मेंढया चौधरवाडी घाटामध्ये चारत असताना एक मेंढी जबरदस्तीने स्कारपिओ कारमध्ये घेऊन गेले. असा एकुन 38,000/- रूपये किमतीच्या शेळी, बोकड व मेंढी आंम्हास मारहान करून दरोडा टाकुन जबरदस्तीने घेऊन गेले आहेत.
पुढील तपास वडगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे करत आहेत.
COMMENTS