Bhor Breaking l संतोष म्हस्के l शर्यतीत बैलगाडा अंगावरून गेल्याने एकाच मृत्यू : भोर तालुक्यातील शिंद येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाडी धावताना अंगावर येवून धडक बसून एक जण सोमवार दि.१५ गंभीर जखमी झाला होता.जखमी व्यक्तीस उपचारासाठी पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवार दि.१६ जखमी व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाल्याची घटना घडली. भोर येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शिंद ता. भोर येथील आलेले विष्णू गेनबा भोमे (वय ६५) शर्यत पाहत असताना बैलगाडी अंगावर येऊन जोरदार धडक बसली.यात भोमे यांच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागला होता.यावेळी तात्काळ भोमे यांना उपचारासाठी पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान येथील मागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत ही छंद म्हणून भरवल्या जात होत्या मात्र सध्याच्या काळात बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याच समोर येत आहे. तर बैलगाडा शर्यतीसाठी गावोगावातील तरुण वर्ग पूर्णता आहारी गेला असून बैलगाडा शर्यतीला कामधंदा सोडून तरुण जात असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणकार व्यक्तींकडून बोलले जात आहे.
To Top