Bhor News l दिडघर येथील ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
दिडघर (ता. भोर) येथील एका तरुणाने मंगळवारी(दि. १६ एप्रिल) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तुषार राजाराम सोंडकर(वय ३५ वर्ष, रा. दिडघर, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भानुदास नामदेव सोंडकर(वय ५७ वर्षे, रा. दिडघर, ता. भोर) यांनी राजगड पोलिसांना खबर दिली.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिडघर येथील आत्महत्येची खबर देणारे भानुदास सोंडकर यांस काही व्यक्तींनी येऊन सांगितले की, तुमचा चुलत भाऊ तुषार सोंडकर याने गावाजवळील म्हसोबाच्या मंदिर परिसरातील सागाच्या झाडाचे फांदीला नायलॉनचा दोरीने गळफास घेतला आहे. त्यानंतर तात्काळ भानुदास सोंडकर यांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक लोकांच्या मदतीने तुषार यांस खाली सोडवून खाजगी वाहनाने नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु सकाळी ९ वाजता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यानंतर राजगड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय ढावरे करीत आहेत.
To Top