सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात बदलत्या हवामानामुळे वाढलेली उष्णता याचा परिणाम होऊन उष्माघाताने चार ते पाच पोल्ट्रीतील ५०० हून अधिक बॉयलर कोंबड्यांची मर (मृत्यू) झाल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आले असून हवालदिल झाले आहेत.
मागील दोन दिवसांपासून दूषित वातावरणात होऊन ढगाळ हवामान तयार झाले आहे.उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.याचा परिणाम होऊन पोल्ट्रीतील बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आसल्याने पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे.खानापूर ता.भोर येथील पोल्ट्री व्यावसायिक नवनाथ तनपुरे,पंकज थोपटे ,पिंटू थोपटे ,कृष्णा थोपटे तसेच अंबाडे येथील विजय खोपडे यांच्या पोल्ट्रीतील ५४० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झालायात पोल्ट्री व्यवसायिकांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. वातावरण बदलामुळे गर्मीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.पुढील काळात ढगाळ वातावरण राहिले तर व वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित झाला तर फॅन, स्प्रिंकल, स्पोगर बंद पडतील व अजूनही मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल.यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होईल असे खानापूर येथील नवनाथ तनपुरे यांनी सांगितले.